साबूदाणा फ्रूट डेझर्ट Pudhari
शारदीय नवरात्र उत्सव

उपवासाचा चविष्ट बेत म्हणजे साबूदाणा फ्रूट डेझर्ट ; या नवरात्रीत जरूर ट्राय करा

अमृता चौगुले

उद्यापासून शारदीय नवरात्रीला प्रारंभ होतो आहे. महाराष्ट्र भर पुढचे नऊ दिवस देवीची मनोभावे उपासना केली जाईल. यासोबतच अनेकजण 9 दिवसांचे उपवासही करतील. आता उपवास म्हणलं नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा सगळ्यांचीच असते. त्यामुळेच काहीसा हटके तरीही उपवासाला चालणारा पदार्थ म्हणजे साबूदाणा फ्रूट डेझर्ट. अत्यंत सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी जरूर ट्राय करून पाहा.

साहित्य :

साबुदाणा : अर्धा कप

फुल क्रीम दूध : अर्धा लीटर

कंडेनस्ड मिल्क : अर्धा कप

बदामाचे काप : 2 मोठे चमचे

काजू : 2 मोठे चमचे

बेदाणे : 2 मोठे चमचे

वेलची : बारीक पूड करून

फुल क्रीम दूध : 1/2 कप (नंतर मिसळण्यासाठी )

सीझननुसार उपलब्ध असलेली फळं

कृती :

सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून एक तास भिजवून ठेवावा. एका तासानंतर 2 मोठे कप पाणी घेऊन तो शिजवावा. हे करताना एक लक्षात असू द्या कि साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यावा. पारदर्शक आणि काहीसा दाट झाला कि साबुदाणा गॅसवरुन उतरून घ्यावा. थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावी.

आता एका पसरट भांड्यात दूध उकळण्यास ठेवावे. दूध उकळून काहीसे दाट होईपर्यंत ढवळत राहावे. दाट होऊलागले कि उतरून बाजूला थंड होण्यास ठेवून द्यावे.

आता सगळी फळे चिरून घ्यावीत. यामध्ये केळी, डाळिंबाचे दाणे, सफरचंदाचे पातळ काप, द्राक्ष, खरबुजाच्या फोडी हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यावे. यात उकळून थंड केलेले दूध, कंडेनस्ड मिल्क आणि शिजवलेला साबुदाणा हे काढून घ्यावेत. आता यात कट केलेले ड्राय फ्रूटचे काप मिसळा.

थंड होण्यासाठी काही काळ फ्रीजला ठेवा. चालत असल्यास गुलाब पाकळ्यांनी सजवून हे डेझर्ट सर्व्ह करू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT